शिवसेना नेते प्रशांत काळे आणि निलेश शिंदे या दोघांचे जनसंपर्क पाहुन पक्षाने दिली जबाबदारी
कल्याणमधील दोन नेते यांची पुणे जिल्ह्याच्या शिवसेना संपर्कपदी नियुक्ती
DT न्यूज/स्वदेश मालवीय
कल्याण : कल्याणमधील दोन शिवसेना नेते प्रशांत काळे आणि निलेश शिंदे यांची पुणे जिल्ह्याच्या शिवसेना संपर्कपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर या दोघांचे जनसंपर्क पाहुन पक्षाने ही जबाबदारी असी दोघांनवर दिली आहे.
शिवसेना कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख व माजी नगरसेवक निलेश शिंदे आणि शिवसेनाचे प्रशांत काळे या दोघांची पुणे जिल्हयासाठी संपर्क प्रमुख पदी नियुक्ती केल्याची घोषणा आज दिनांक ३ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आली आहे. प्रशांत काळे यांना पर्वती पुणे छावणी, कसबा पेठ विधान सभा या तीन विधानसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर निलेश शिंदे यांची जिल्हयातील वडगाव शेरी, शिवाजीनगर कोथरुड विधानसभा मतदार संघाकरीता नियुक्ती करण्यात आली आहे.
निलेश शिंदे आणि प्रशांत काळे या दोघांना प्रत्येक महिन्यात दोन संपर्क दौरे करणे अपेक्षित आहे. संपर्क दौऱ्याचा अहवाल दर महिन्याला संबंधित जिल्ह्याचे लोकसभा प्रमुख आणि बाळासाहेब भवन याठिकाणी देणे असणे असेल .प्रशांत काळे यांची राजकीय सुरुवात राष्ट्रवादीकडून झाली होती. त्यांच्या पत्नी राष्ट्रवादीतून नगरसेविका पदी निवडून आल्या होत्या. काळे आणि त्यांच्या पत्नीने शिवसेनेत प्रवेश केला. काळे यांच्यावर कल्याण पूर्वेची उप विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी दिली गेली. त्यांनीही चांगल्या प्रकारे काम केल्याने त्यांच्याकडेही पुण्यातील दो मतदार संघाची जबाबदारी दिली गेली आहे.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा