कल्याण पूर्व १४२ मतदार संघात भूमिपूजन सोहळा

 आमदार गणपत गायकवाड यांच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा

DT न्यूज/स्वदेश मालवीय

कल्याण :कल्याण पूर्व १४२ मतदार संघाचे आपला माणूस ,आपला आमदार असे स्थानिक जनतेशी नाते जुळलेले लोकप्रिय आमदार गणपत गायकवाड म्हणून प्रसिद्ध आहेत. यांच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला. राज्य शासनाच्या विशेष विकास निधी मधून नांदीवली विभागात चाळीत राहणाऱ्या लोकांना रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

                    आमदार गणपत गायकवाड

   कोरोना काळात संकटाच्या स्थितीत माणसांचे जीव वाचविणे हे पाहिलं कर्तव्य होते. गेल्या दोन वर्षात विकास कामात अडथळा निर्माण झाला होता;परंतु कोरोनाचा संकट काही प्रमाणात स्थिरावल्याने राज्य शासनाकडून विकास कामांसाठी निधी मंजूर करण्यात आल्याने कल्याण पूर्वचे स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी नांदीवली विभागात न्यू अर्जुन कॉलनी ते साईकृपा चाळीतील रहिवाश्याच्या सुखसोईसाठी रस्त्याचे काँक्रीटीकरण  पावसाळ्यापूर्वी काम सुरू करण्यासाठी प्रयत्न केले आहे.

तसेच कल्याण पूर्व विभागात नांदीवली तलावाला लागून जॉगिंग ट्रक बनविणे,संजोग सोसायटी,मातोश्री शाळा परिसरात गटार ,पायवाट तयार करणे,तसेच गावदेवी व्यायाम शाळा ते सद्गुरू सोसायटी पर्यंत रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे अशा स्थानिक लोकांच्या गरजेनुसार विकास कामांसाठी तात्काळ भूमिपूजन सोहळा घेण्यात आला.

टिप्पण्या