केडीएमसी अंतर्गत अनाधिकृत बांधकामेवर निष्कासनाची कारवाई
*महापालिकेच्या विविध प्रभागात बहुमजली अनाधिकृत बांधकामेवर धडाकेबाज कारवाई सुरू
DT न्यूज़/स्वदेश मालवीय
कल्याण : अनाधिकृत बांधकामांवर निष्कासनाची प्रभावी कारवाई करुन महापालिका परिसरातील सर्व सामान्य नागरिकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी , कल्याण डोम्बिवली महापालिका (केडीएमसी)आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिकेच्या सर्व प्रभागातील सहा.आयुक्तांमार्फत *आज सकाळपासूनच* *ई,आय व ह प्रभागक्षेत्रांतील* *बहुमजली अनाधिकृत बांधकामे निष्कासित करण्याची धडाकेबाज कारवाई सुरू* करण्यात आली आहे.
आज सकाळी ह प्रभागातील नवापाडा परिसरात पवन चौधरी यांच्या G+5 अनाधिकृत इमारतीवर व भास्कर पाटील यांच्या डोंबिवली पश्चिम झिप-या आर्केडच्या बाजूला असलेल्या G+7 अनाधिकृत इमारतीच्या बांधकामावर सहा.आयुक्त अक्षय गुडधे, सुधीर मोकल आणि त्यांच्या पथकाने 6 ब्रेकरच्या मदतीने निष्कासनाच्या कारवाईस प्रारंभ केला.
आय प्रभागातही आडिवली ढोकळी परिसरात ज्ञानेश्वर भाने व रणदिप पवार यांच्या G+4 इमारतीच्या बांधकामावर;उपायुक्त बाला आहेब चव्हाण, सहा.आयुक्त संजय साबळे,हेमा मुंबरकर,किशोर ठाकूर,सुहास गुप्ते यांच्या पथकाने 3 कॉम्प्रेसर, 1 ब्रेकरच्या सहाय्याने निष्कासनाची धडक कारवाई सुरु केली.
*सह.उपायुक्त बाला आहेब चव्हाण*त्याप्रमाणे ई प्रभागात माणगाव डोंबिवली पूर्व येथील मौलिक शहा यांच्या G+7 अनाधिकृत इमारतीच्या बांधकामावर सहा.आयुक्त भारत पवार, सविता हिले, राजेश सावंत यांच्या पथकाने 1 पोकलेन, 1 जेसीबी, 2 ब्रेकरच्या सहाय्याने निष्कासनाची धडक कारवाई आज सुरु केली आहे.
अनाधिकृत बांधकामाविरुध्द निष्कासनाची मोठी कारवाई आज महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथक व पोलिसांच्या मदतीने करण्यात येत असून सदर कारवाई पुढील तीन दिवस सुरू राहणार आहे.
अशा अनाधिकृत इमारती निष्कासीत केल्यानंतर निष्कासनासाठी आलेल्या खर्चाची रक्कम संबंधित व्यक्तींच्या/विकासकांच्या मालमत्तेवर बोजा लावून वसूल करणेबाबतचे निर्देशही महापालिका आयुक्तांनी सहा.आयुक्तांना दिले आहेत तसेच जमीन मालक/ विकासक/ भोगवाटा धारक यांच्या महापालिका क्षेत्रातील इतर मालमत्ता सोधून त्यांच्यावर देखील बोजा चढवण्याची कारवाई करणेबाबत तसेच यापूर्वी निष्कासीत केलेल्या परंतू अदयापपर्यंत निष्कासनाचा खर्च वसूल करण्यात आलेला नाही अशा सर्व मिळकतींच्या निष्कासनाचा खर्च वसूल करण्यासाठी महसूल दप्तरी महापालिकेच्या नावे बोजा चढवण्याची कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.





टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा