हायप्रोफाईल सोसायटीत हत्त्या आणि आत्महत्त्या

 डोम्बिवालित प्रियसीची हत्या करून प्रियकरानी केली आत्महत्या


DT न्यूज/ स्वदेश मालवीय

डोम्बिवली:  डोम्बिवालित एका हायप्रोफाईल सोसायटीत प्रेयसी व प्रियकराच्या शव मिळाल्याने एकच खळबळ उडालेली आहे. दुसऱ्या तरुणाशी लग्न ठरल्याच्या वादातून प्रेयसीची हत्या करून प्रियकराने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना डोंबिवली पूर्वेकडील हायप्रोफाईल सोसायटी असलेल्या कसारिया गोल्ड कॉम्प्लेक्स मधील एका इमारतीच्या फ्लेट मधे घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा व आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अनिल साळुंखे (वय- ३३) असे प्रियसीची हत्या करून आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. तर ललीता काळे ( वय-२८ ) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे.


मृतक अनिल हा नाशिक जिल्ह्यातील चांदवडमधील एका गावाचा रहिवाशी होता. तर हत्या झालेली ललीता ही डोंबिवली पूर्वेतील कसारिया गोल्ड कॉम्प्लेक्स मध्ये राहत होती. या दोघांमध्ये अनेक वर्षा पासून प्रेम संबध होते.प्रियकराचा लग्न आधी झाल्याची सूचना मिळते ही त्यातच ललीताने दुसऱ्या तरुणाशी लग्न करण्याचा निर्णय घेवून त्या तरुणासोबत कुंकवाचा कार्यक्रम लावला . याच गोष्टीचा राग धरून मृत ललीताला शेवटचे भेटण्याचा बहाणा करून तीला भेटायला २९ मे रोजी सायंकाळच्या सुमारास आला होता. त्यानंतर पुलिसाने सांगितले तिच्या राहत्या घरातील एका रूम मध्ये दोघे सोबत झोपला असतांना मध्यरात्रीच्या सुमारास बेडरूमचा दरवाजा आतुन कडी लावून बंद केला. त्यानंतर ललीताच्या गळ्या भोवती नायलॉन दोरीने गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर स्वतः त्याच नायलॉनच्या दोरीने फास घेवून आत्महत्या केली.

३० मे रोजी, बराच वेळ झाला बेडरूमचे दार आतून बंद असल्याचे मृतकच्या बहिणीला दिसले. त्यामुळे तिने घरच्यांना माहिती दिली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. तर घटनेची माहिती मानपाडा पोलिसांना मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत दोघांचे मृतदेह शविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना केले होते. याप्रकरणी मृतक ललिताची बहीण अनिता हिच्या तक्रारीवरून मृतक प्रियकर अनिल याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. लांडे करीत आहेत

टिप्पण्या