कल्याण पूर्वेतील शिवसंपर्क अभियानाला उत्फुर्त प्रतिसाद
ठाणे जिल्हयातील शिवसेनेची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे:खा. हेमंत पाटील
DT न्यूज़ /स्वदेश मालवीय
कल्याण - संपूर्ण राज्यात शिवसेनेने कार्यकर्ता संपर्क अभियानाला मोठ्या उत्साहात प्रारंभ केला आहे, याच अभियाना अंतर्गत कल्याण पूर्व शिवसेनेच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शिव संपर्क कार्यकर्ता संवाद अभियानाला उत्फुर्त असा प्रतिसाद लाभला .
कोळसेवाडीतील दुर्गामाता मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या शिवसंपर्क अभियानात निरिक्षक आणि खासदार हेमंत पाटील आणि शिवसेना उपनेते अल्ताफ शेख यांचे मोलाचे असे मार्गदर्शन लाभले .
या समयी हेमंत पाटील यांनी उपस्थितांना संबोधीत करतांना सांगितले की, साम दाम दंडभेद वापरून शिवसेनेला बदनाम करण्याचे विरोधकांचे कटकारस्थान सुरु आहे . या करकारस्थानांना वेळीच गाडून ठाणे जिल्हयातील शिवसेनेची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या अधक प्रयत्नाने ठाणे जिल्ह्यात फोफावलेल्या शिवसेनेची ताकद आजही अबाधीत आहेच, परंतु गाफील राहून चालणार नाही, आदिलशाही प्रमाणेच अमित शाही ने पाठवलेया अफजल खांला सुध्दा या महाराष्ट्रात गाडून टाकण्यासाठी सर्वांनी एकजूटीने कामाला लागले पाहिजे .
शिवसेना उपनेते अल्ताफ शेख यांनी सांगितले की, वयोमानानुसार जुने आणि जेष्ठ मंडळी राजकारणातून कधी ना कधी रिटायर होत असतातच परंतु त्यांची धुरा सांभाळण्यासाठी तरुणाईने पुढे आले पाहिजे, कोरोना कालावधी मध्ये कल्याण पूर्वेतील नगरसेवक महेश गायकवाड यांनी जनतेसाठी केलेले कार्य सर्व तरुणाईसाठी आदर्शवत आहे, जनतेची निस्वार्थी पणे कशी सेवा करायची हे महेश गायकवाड आपल्या कार्यातुन सातत्याने दाखवत असतात, तरुणाईसाठी त्यांचे कार्य आदर्शवत आहे, पक्ष भेद विसरून कार्य करत राहिले तर जनता नेहमीच पाठीशी उभी रहाते असेही ते म्हणाले .
या समयी व्यासपीठातर शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, महिला आघाडी प्रमुख विजयाताई पोटे, राधिका गुप्ते, बालाजी किणीकर, सहसंपर्क प्रमुख शरद पाटील, व्याख्यात्या सुवर्णा वांजळे, रमाकांत देवळेकर आदी मान्यवर उपस्थित होते .
शिवसेनेच्या या शिव संपर्क संवाद मेळाव्यास माजी महापौर रमेश जाधव, माजी नगरसेवक महेश गायकवाड, राजाराम पावशे, पुरुषोत्तम चव्हाण,निलेश शिंदे, कैलाश शिंदे, नवळी गवळी, मनोज चौधरी, मल्लेश शेट्टी, स्नेहा पिंगळे, राजवंती मढवी,संगिता गायकवाड , शितल मंढारी, माधुरी काळे, युवा सेनेचे कुमारी तेजस्वी शरद पाटील, रोहीत डुमणे, भूषण यशवंतराव उत्तर भारतीय सेलचे सी . पी . मिश्रा यांचे सह शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्र संचलन हेमंत चौधरी यांनी केले तर उपस्थितांचे आभार रमाकांत देवळेकर यांनी मानले




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा