प्रतिबंधित पिशव्यांवरील मनपाची धडक कारवाईत 55 हजार रु. वसूल
महानगरपालिकाच्या खात्यात कारवाईच्या 55 हजार रु. दंड जमा
DT न्यूज़/स्वदेश मालवीय
कल्याण : महापालिकेच्या विविध प्रभागात प्रतिबंधित प्लॅस्टिक पिशव्यांवरील धडक कारवाईत 55 हजार रुपये दंड वसूल झाले आहेत,यानी महापालिकेच्या खात्यात 55 रुपये चा इजाफा झालाय. हे ही विभागाचे उपआयुक्त अतुल पाटील यांची पोषटिंग झाल्या पासून सतत कार्यवाई करण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त अतुल पाटील यांनी महापालिका क्षेत्रात प्रतिबंधित प्लास्टिक निर्मुलनाबाबत कडक भूमिका अवलंबिली असून आज त्यांचे निर्देशानुसार महापालिकेच्या विविध प्रभागात प्रतिबंधित प्लॅस्टिक पिशव्यांवरील धडक कारवाईत रु.55 हजार दंड वसूल करण्यात आला. यापैकी रु. 5000/-दंड ब प्रभागक्षेत्रात परिसरातून, रु. 30,000/- दंड क प्रभागक्षेत्रातील शिवाजी चौक, महमंद अली चौक, लक्ष्मी मार्केट, झुंझारराव मार्केट या परिसरातून व रु. 20,000/-दंड फ प्रभागक्षेत्रातून पाथर्ली रोड, एम.आय.डी.सी. या परिसरात आढळून आलेल्या प्रतिबंधित प्लास्टिकवर आकारण्यात आला आहे. आज सदर कारवाईत 21 आस्थापनांना भेटी देवून त्यांचेकडून सुमारे 20 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले.
त्याचप्रमाणे रस्त्यावर कचरा टाकणे याकरीता अ प्रभागात रु 1000/-व ग प्रभागात रु. 3000/- असा एकुण रु.4000/-प्रशासकीय अधिभार दंड स्वरुपात आज संबंधित प्रभागक्षेत्र अधिकारी यांनी त्यांचे कर्मचारी पथकाच्या मदतीने वसूल केला.




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा