कल्याण डोंबिवली महानगरपालिकाची हथौड़ा कारवाई सुरुच

 महापालिकेच्या विविध प्रभाग क्षेत्रात पदपथांवरील अतिक्रमणे निष्कासनाची महिला ऑफिसर तर्फे धडक कारवाई  


DT न्यूज़ /स्वदेश मालवीय

कल्याण :नागरिकांना पदपथावरुन चालणे सोयीचे व्हावे या दृष्टीकोनातून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यापूर्वीच दिलेल्या निर्देशानुसार "ज" प्रभागाच्या  सहा. आयुक्त हेमा मुंबरकर  यांनी कल्याण पूर्व कचोरे येथील स्मशानभूमीसाठी आरक्षित असलेल्या जागेवर उभारण्यात आलेल्या 3 शेड्स आणि  नव्याने बांधलेल्या 5 झोपड्या फेरीवाला विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने निष्कासित करण्याची कारवाई केली .


ड प्रभागातही सहा. आयुक्त सविता हिले यांनी कल्याण पूर्व चक्की नाका, कैलास नगर, शंकर पावशे रोड या परिसरातील रस्त्याच्या पदपथावर दुकानदारांनी केलेले 2 शेडस निष्कासित करण्याची  कारवाई अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने केली आणि संबंधितांना अतिक्रमण करण्यास मज्जाव करण्यात येऊन सदरचे फूटपाथ नागरिकांना चालण्यासाठी मोकळे करण्यात आले.

त्याचप्रमाणे क प्रभागाचे सहा. आयुक्त सुधीर मोकल यांनी कल्याण पश्चिमेतील छत्री बंगला ते संदीप हॉटेल या परिसरातील  रस्ता रुंदीकरणात  बाधित होणारी 11 भंगार दुकाने  त्याचप्रमाणे कल्याण बस डेपो समोरील 2 हातगाड्या व 3 शेड्स निष्कासित करण्याची धडक कारवाई   अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिकेचे पोलीस कर्मचारी, महात्मा फुले पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी व 2 जेसीबीच्या सहाय्याने केली .

टिप्पण्या