कल्याण डोंबिवलीत बॅनर्स, पोस्टर्स हटाओ मोहिम्

महानगरपालिकाच्या पोस्टर्स काढण्याची धडक कारवाई                                              

 

 DT न्यूज़/स्वदेश मालवीय                                          कल्याण : महापालिकेच्या विविध प्रभागात, शहराच्या विद्रुपीकरणात भर घालणारे   बॅनर्स, पोस्टर्स काढण्याची  धडक कारवाई करण्यात आली आहे. या मोहिम मधे 5/ D आणि H प्रभागात करण्यात आली आहे.

  महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतील कायापालट अभियानाअंतर्गत  5/ड प्रभागाच्या सहा. आयुक्त सविता हिले यांनी कल्याण पूर्व येथील पुना-लिंक रोडवरील, कल्याण डोंबिवली नगरीच्या विद्रुपीकरणात भर घालणारे, अनधिकृतपणे लावणेत आलेले 9 पोस्टर्स, 27बॅनर तसेच 31 झेंडे काढण्याची कारवाई अतिक्रमण निर्मुलन विभागातील कर्मचाऱ्यांमार्फत केली. 


ह प्रभागातही सहा. आयुक्त प्रमोद पाटील यांनी  डोंबिवली पश्चिम येथील  रेतीबंदर रोड ते उमेश नगर रोडवरील 16  बॅनर,3 पोस्टर व 4 झेंडे काढून टाकण्याची कारवाई अतिक्रमण निर्मुलन विभागातील    कर्मचा-यामार्फत आज  केली.

टिप्पण्या