शिवसेना उपविभाग प्रमुख सुमेध हुमणे यांचा स्तुत्य उपक्रम

 शिवसेनेच्या 56व्या वर्धापन दिनी ज्येष्ठ नागरिकांना छत्री व विद्यार्थ्यांना वह्या वाटप


DT न्यूज/स्वदेश मालवीय

कल्याण (प्रतिनिधी)आज शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून कल्याण पूर्व मधील उत्तर भारतीय समाज मंदिर हॉल मध्ये शिवसेना उपविभाग प्रमुख सुमेध हुमणे यांच्या आयोजनात कल्याण डोंबिवली महानगरपालिका पॅनल क्रमांक 19, विजय नगर, दुर्गा नगर हनुमान नगर परिसरातील जेष्ठ नागरिक, महिला, शिवसैनिक, कार्यकर्ते यांना ६००छत्र्यांचे वाटप करण्यात आले. तसेच या कार्यक्रमात प्रभागातील १०वीचे ४५ ,१२वी ३२ उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 


    कार्यक्रमाच्या सुरवातीला महापुरुषांच्या व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त केक कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली! 


याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब रोकडे,स्मारक समिती अध्यक्ष देवचंद आंबादे, विधानसभा सहसंपर्क प्रमुख शरद पाटील,माजी नगरसेवक महेश गायकवाड,  शरद पावशे,समाजसेवक सुबोध भारत,माजी नगरसेविका शितल मंढारी,उपविभागप्रमुख संजीव पिंगळे, दिपक आजगावकर,गंभाजी लाड,शंकर पाटील,समाजसेवक उत्तम गवळी,महिला विभागप्रमुख विद्या कुमावत,शाखा संघटक ज्योत्स्ना मोंडकर,मीना मुठे,शाखाप्रमुख राजेश पेडणेकर,प्रशांत बोटे, उपशाखाप्रमुख उत्तम घाडीगांवकर, महेश नाईक, कृष्णकांत मोरे, पुरूषोत्तम बारापत्रे, सुरज केळजी,मेघनाथ चव्हाण,वसंत चव्हाण, ज्येष्ठ शिसैनिक वामन कांबळे,युवा सेना सागर घायवाट,गटप्रमुख संदीप शिंदे,देवेंद्र काळे,युवासेना पदाधिकारी दिपीका केळजी,पत्रकार शाहीन मुल्ला,समाजसेविका पुष्पा पवार,प्रभागातील ज्येष्ठ नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते...

 या  कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपली मतं व्यक्त केली.. आगामी निवडणुकीत समाजकारण करणारा थारा द्या,  कठीण काळी राजकारण करणाऱ्यांना  थारा नका देऊ नका असे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी सांगितले.

शिवसेना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करते मात्र कठीण वेळप्रसंगी 100% समाज कारण करते असे सांगून पॅनल क्रमांक 19 मधील नागरिकांसाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी समाजसेवक, उपविभाग प्रमुख सुमेध हुमणे यांचे कौतुक केले.

टिप्पण्या