इंडोर गेम्ससाठी अद्यावत पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देणार: डॉ श्रीकांत शिंदे

 दीपेश म्हात्रे व जयेश म्हात्रे यांच्या संकल्पनेतून अद्यावत उद्यान


DT न्यूज़ /स्वदेश मालवीय

डोंबिवली : खंबाळपाडा येथे असलेल्या पालिकेच्या भूखंडावर अद्यावत आधुनिक सुविधांनी सज्ज असे अद्यावत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभाणार या बाबतचा डीपीआर तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी क्रिकेट, फुटबॉल, टेबल टेनिस, लाँग टेनिस, रनिंग ट्रॅकसह इंडोर गेम्ससाठी अद्यावत पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी १० कोटीचा निधी दिला असून आणखी निधी लागल्यास देण्यात येईल असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे  यांनी सांगितले आहे. डोंबिवली पश्चिमेकडील आनंद नगर येथील आनंद उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे डोंबिवलीत आले होते. यावेळी ते बोलत होते.


नगरसेवक दीपेश म्हात्रे व जयेश म्हात्रे यांच्या संकल्पनेतून व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून हे अद्यावत उद्यान साकारण्यात आले आहे. नगर विकासमंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या लोकार्पण सोहळ्याला ऑनलाईन शुभेच्छा दिल्या. या उद्यानात लहान मुलांसाठी अद्यावत खेळणी, खेळताना पडल्यास मुलांना इजा होवू नये म्हणून मॅट, लहान मुलांसाठी अद्यावत वॉटर फाऊंटन अशी सुविधा या उद्यानात उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरात जिथे मोकळी जागा आहे त्या ठिकाणी लोकांसाठी अशा प्रकारची अद्यावत उद्याने उपलब्ध करून दिली पाहिजेत, असे खासदार शिंदे यांनी सांगितले

टिप्पण्या