अतिक्रमण निर्मुलन विभागाचे मदतीने निष्कासनाची धडक कारवाई

 महानगरपालिका, तर्फे शेड्सवर निष्कासनाची कारवाई

DT न्यूज़ /स्वदेश मालविय 

 कल्याण : 22जून 2022 रोजी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 2/ब आणि 4/जे प्रभागात शहराच्या विद्रुपीकरणात भर घालणा-या शेड्सवर निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली आहे.

महापालिकेच्या  2/ब प्रभागाचे सहा. आयुक्त किशोर ठाकुर यांनी कल्याण(प.) मधील साई चौक, गोदरेज हिल, खडकपाडा, सिनेमॅक्स रोड, घोलप नगर येथील फुटपाथ व रस्त्यालगत असणा-या 26 वेदर शेड, 2 हातगाड्या व 15 बाकडे निष्कासनाची व 6 हातगाड्या जप्त करण्याची कारवाई अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने व 1 जेसीबी,1 डंम्परच्या सहाय्याने केली. 

त्याचप्रमाणे 4/जे प्रभागातही सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी त्यांच्या फेरीवाला विभागाच्या कर्मचा-यांच्या मदतीने कल्याण पूर्व येथील जुनी जनता बँक परिसरातील रहदारीस अडथळा निर्माण ठरणा-या 02 शेड्सवर निष्कासनाची कारवाई केली.

टिप्पण्या