कल्याण पूर्व प्रभाग ५/ड मधील कैलास नगर येथे मनपाची हथौड़ा कारवाई
अतिधोकादायक इमारत वर कडोमपा अधिकारी तर्फे कारवाई
DT न्यूज़ /स्वदेश मालवीय
कल्याण : कल्याण पूर्व प्रभाग ५/ड मधील कैलास नगर येथील नवसाईकृपा (गणेश अपार्टमेंट) को. ऑप.हौ. सो. या इमारतिला या पूर्वीच अतिधोकादायक घोषित असून ,महापालिकाचे अधिकारी व कर्मचारी तर्फे मोठी कर करण्यात आली आहे.
मनपा आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार व विभागीय उप आयुक्त वंदना गुळवे यांचे मार्गदर्शनाखाली आज 23 जून 2022 रोज प्रभाग ५/ड मधील कैलास नगर येथील नवसाईकृपा (गणेश अपार्टमेंट) को. ऑप.हौ. सो. या इमारतिला या पूर्वीच अतिधोकादायक असल्याबाबत ची नोटिसा देण्यात आलेल्या होती .
सदर बिल्डिंगच्या लागत चाल सदृश घरे असल्याने वरचा मजला प्रथमत: मनुष्यबळाने निष्कासित करण्यात आले व उर्वरित इमारतीचा भाग पोकलेन च्या सहाय्याने निष्कासित करण्याचे काम चालू करण्यात आलेले आहे. सदर कारवाई मनपा के सहा. आयुक्त सविता हिले मॅडम व इकडील प्रभागाचे अतिक्रमण पथक त्या व्यतिरिक्त, ठेकेदारांचे कर्मचारी यांचे समवेत मोठी कारवाई करण्यात आली आहे.




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा