जगन्नाथ शिंदे शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे एकाचा दिवसात शासकीय दाखले

 जगन्नाथ शिंदे शिक्षण प्रसारक मंडळ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आयोजित एक दिवसीय शासकीय दाखले वाटप शिबिर संपन्न 

DT न्यूज/स्वदेश मालवीय

कल्याण : कल्याण पूर्व मॉडेल कॉलेज चिंचपाडा रोड येथे शनिवार शासकीय दाखले नोंदणी त्यान नंतर त्याचे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते  यामध्ये डोमिसाइल सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला, स्थानिक रहिवासी दाखला, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र असे शासकीय दाखले वाटप करण्यात आले. या दाखले वाटप शिबिरात 1365 जणांनी अर्ज दाखल केले होते .  अर्ज स्वीकारण्याची वेळ दुपारी दोन च्या ऐवजी पाच वाजेपर्यंत करून संध्याकाळ पर्यंत  849जणांना आपले दाखले जाग्यावर उपलब्ध करून देण्यात आले.


या कार्यक्रमाची सुरूवात शिव शिवछत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली , या कार्यक्रमाला धनंजय बोडारे, ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी उल्हासनगर महानगरपालिका सभागृह नेता, सहसंपर्क प्रमुख कल्याण पूर्व शिवसेना शरद पाटील, ज्येष्ठ माजी नगरसेवक निलेश शिंदे, हर्षवर्धन पलांडे उपशहरप्रमुख.


मॉडेल कॉलेज उपप्राचार्य ब्रह्मावले  सर, गणपत घुगे विभाग प्रमुख, दीपक आजगावकर उपविभागप्रमुख, अनंत आंब्रे उपविभाग प्रमुख, वासुदेव कदम उपविभाग प्रमुख, विजय भोसले सहयोग सामाजिक संस्था अध्यक्ष, संतोष साळवी शाखाप्रमुख ,विवेक बर्वे शाखाप्रमुख ,संतोष चव्हाण उपविभाग प्रमुख, सुरेखा बनसोडे उपशहर संघटक, स्मिता कदम विभाग संघटक, भारती मिसठे उप विभाग संघटक, मीना विर शाखा संघटक,संगीता सईद उप शाखा संघटक, संगीता गोष्टे,अश्विनी दवंडे, मंगला तांबे ,आनेराव, शुभांगी मुतकेकर , निना बेळबकर,  तसेच या शिबिराचे आयोजन प्रशांत उत्तम काळे विधानसभा संघटक, मा. नगरसेविका माधुरी प्रशांत काळे, मनोज बेळमकर  उपविभाग प्रमुख यांनी केले आहे.


 सोबत कल्याण तहसीलदार कार्यालयाचे सेतू प्रमुख दिनेश वाळुंज, तलाठी तानाजी कुंभार, किरण कदम, जुगरे सखाराम, सह १५ कल्याण तहसील कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते, एकाचा दिवसात शासकीय दाखले मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालक वर्गाच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसत होते..

टिप्पण्या