कायदेशीर लढाई सुरु झालेली आहे:-गोपाल लांडगे
डोम्बिवलित शिवसैनिकांची बैठक पार पडली
DT न्यूज़/ स्वदेश मालवीय
डोम्बिवली: शिवसैनिकांमध्ये आपापसात वादावादी आणि गैरसमज नको म्हणून आज डोंबिवलीच्या माऊल हॉलमध्ये शिवसैनिकांची बैठक पार पडली. या बैठकीस शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे असे म्हणाले की आम्ही शिवसेनेतच आहोत. या बाबतीत कायदेशीर लढाई सुरु झालेली आहे. निश्चीतपणे त्या बाबतीत जो काही निर्णय लागेल, जो काही पक्षाचा आदेश येईल. त्या प्रमाणो शिवसैनिक काम करतील,या बैठकीत डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे आणि युवा सेनेचे जिल्हा नेते दीपेश म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे1 जुलैपासून बदलणार 'हे' 5 मोठे नियम, थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल
या बैठकीच्या वेळी कल्याण जिल्हा प्रमुख लांडगे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात जे काही सुरु आहे. विशेषत: शिवसेनेत जे काही चालले आहे. बंडखोरी झालेली आहे. सगळे म्हणतात, आम्ही शिवसेनेतच आहोत. या बाबतीत कायदेशीर लढाई सुरु झालेली आहे. निश्चीतपणे त्या बाबतीत जो काही निर्णय लागेल, जो काही पक्षाचा आदेश येईल. त्या प्रमाणो शिवसैनिक काम करतील. शिवसैनिकांमध्ये गैरसमज आणि आपापसात वादावादी होऊ नये. सत्य परिस्थिती त्यांच्यासमोर यावी यासाठी ही बैठक घेण्यात आली.
या राजकीय पाश्र्वभूमीवर शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे कल्याण डोंबिवलीचा दौरा करणार आहेत का? अशी विचारणा लांडगे यांना केली असता त्यांनी सांगितले की, मुंबई पासून कजर्त, अलिबाग एमएमआर रिजनमध्ये बैठका सुरु आहेत. कल्याण डोंबिवलीला येण्याचे तूर्तास तरी नियोजन नाही.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा