कल्याण डोंबिवली शहरात बेवारस पडलेल्या वाहने वर मनपाची कारवाई
6/फ आणि 4/जे प्रभागात बेवारस / भंगार वाहने उचलण्याची धडक कारवाई
DT न्यूज़/स्वदेश मालवीय
कल्याण: महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील वाहतूकीची कोंडी कमी व्हावी आणि पादचा-यांना रस्त्यावरील रहदारीतून ये-जा करणे सुलभ व्हावे या दृष्टीकोनातून कल्याण डोम्बिवली शहरात बेवारस वाहने वर कारवाई करण्यात आली आहे.
6/फ प्रभागाचे सहा. आयुक्त संजय जाधव यांना काल दिवसभरात डोंबिवली पूर्व येथील गोपाळ नगर, पेंडसे नगर, जिजाई नगर या परिसरातील बेवारस/भंगार वाहने उचलण्याची कारवाई केली. यामध्ये 1 चारचाकी, 1 तीन चाकी व 2 दुचाकी अशी एकुण 04 बेवारस/भंगार वाहने अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी, महापालिकेचे पोलिस कर्मचारी व वाहतूक पोलीस यांच्या मदतीने आणि 1 टोईंग मशिनच्या सहाय्याने उचलून खंबाळपाडा येथील वाहन तळावर जमा करण्यात आली.
त्याचप्रमाणे 4/जे प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी कल्याण पूर्व येथील नेतीवली, चक्कीनाका,लोकधारा, लोकग्राम , तिसगाव या परिसरातील रस्त्यावर पडून असलेली व दैनंदिन वाहतुकीस बाधा ठरणारी बेवारस व मोडकळीस आलेली 1 चारचाकी, 4 तीन चाकी व 1 दुचाकी अशी एकूण 06 बेवारस वाहने खंबाळपाडा येथील वाहनतळावर जमा केली. सदर कारवाई अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी , वाहतूक विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे मदतीने आणि टोइंग मशीन , 2 डंम्पर व 1 जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आली.




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा