बारावीचा निकाल जाहीर
राज्याचा एकूण निकाल ९४.२२ टक्के लागला आहे
DT न्यूज़/स्वदेश मालवीय
मुंबई : राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेत बुधवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ वाजल्यापासून निकाल उपलब्ध होतील. राज्याचा एकूण निकाल ९४.२२ टक्के लागला आहे.
कोकण बोर्डाचा सर्वाधिक निकाल ९७.२१ टक्के लागला आहे. मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी (९०.०४ टक्के) लागला आहे. २०२० च्या तुलनेत निकालात .३५६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२१ मध्ये परीक्षा घेण्यात आली नव्हती. या वर्षीही मुली सर्वोत्तम आहेत. ९५.३५ टक्के महिला व ९३.२९ टक्के पुरुष विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच २४ विषयांचा निकाल १००% लागला आहे.
विद्यार्थ्यांची आकडेवारी:
परीक्षेला बसलेले विद्यार्थी : १४ लाख ३९ हजार ७३१, उत्तीर्ण विद्यार्थी: १३ लाख ५६ हजार ६०४
– निकालाची टक्केवारी: ९४.२२ टक्के
विभागानुसार निकाल
पुणे : ९३.६१ टक्के
नागपूर : ९६.५२ टक्के
औरंगाबाद : ९४.९७ टक्के
मुंबई : ९०.९१ टक्के
कोल्हापूर : ९५.०७ टक्के
अमरावती : ९६.३४ टक्के
नाशिक : ९५.०३ टक्के
लातूर : ९५.२५ टक्के
कोकण : 97.21 टक्के
.jpeg)
.jpeg)



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा