आम्हाला महाविकास आघाडी नको हाेती म्हणून आम्ही बाहेर पडलाे :- आ विश्वनाथ भोईर

  आम्ही शिवसैनिकच आहोत :आमदार विश्वनाथ भोईर

DT न्यूज़/स्वदेश मालवीय

कल्याण :. शिवसेना संपवण्याचा राष्ट्रवादीचा डाव होता म्हणून आम्ही बाहेर पडलो. आम्ही बाहेर पडून कोणत्या पक्षात विलीन झालो नाही. आम्हाला महाविकास आघाडी नको हाेती म्हणून महाविकास आघाडीतून बाहेर पडलाे आहाेत. यामुळं आम्हांला जर गद्दार ठरवत असतील तर गद्दाराची व्याख्या काय ही त्या लोकांनी जाहीर करावी, आम्ही शिवसैनिकच आहे. असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार विश्वनाथ भोईर यांनी एका पत्रकार परिषेद केले आहे.  

     आमदार विश्वनाथ भोईर पत्रकार परिषेद

आमदार विश्वनाथ भोईर हे शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख ही आहे. शिंदे गटात सामील झाल्यानंतर त्याच्या शहर प्रमुख पदाच्या इस्तीफा बाबत चर्चा बाबत विचारल्या वर आमदार भोईर यांनी शहर प्रमुख पदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही ,मी अजूनही शिवसैनिक , उद्धवजी पक्ष प्रमुख आहेत त्यांनी माझी शहर प्रमुख पदी नियुक्ती केली होती. त्यांना पसंत असतील तर ते ठेवतील हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे.

      आमदार विश्वनाथ भोईर पत्रकार परिषेद

तसेच नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दी बा पाटील यांचा नाव देण्याबाबतचा निर्णय आहे तो मंत्रिमंडळात होईल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केला होता मात्र सदर बैठक वैध की अवैध हे सुद्धा अजून ठरलेलं नाही ,मात्र दिबा पाटलांच्या नावाबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांकडे नक्की आग्रह धरू ,हा इथल्या भूमिपुत्रांचा भावनिक प्रश्न आहे त्यामुळे या प्रश्नाबद्दल मी मुख्यमंत्र्यांशी नक्की बोलणार आणि सकारात्मक उत्तर घेनार अस आमदार भोईर यानी सांगितल.

टिप्पण्या