उल्हासनगर गेलं खड्ड्यात:वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर
खड्ड्यात बसून अनोखे धरणे आंदोलन
DT न्यूज़/स्वदेश मालवीय
उल्हासनगर: उल्हासनगरच्या रस्त्यांची हालत अक्षक्षा दुर्दैवी झाली आहे म्हणून महापालिका प्रशासनाच्या विरोधात आज वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर शहराच्या वतीने रस्त्यातील खड्ड्यात बसून धरणे आंदोलन करण्यात आले.आणि त्या वेळी आंदोलनकर्ते उल्हासनगर गेलं खड्ड्यात असे बोलत होते.
आज शहरात जागोजागी मोठमोठाल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्याच प्रमाणे शहरातील सी ब्लॉक,डॉल्फिन हाँटेल पासून काकाचा धाबा ते साईबाबा मंदिर शांतिनगर या परिसरातील रोड, रस्त्यांची हालत अक्षक्षा दुर्दैवी झाली आहे . म्हणून महापालिका प्रशासनाच्या विरोधात आज वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर शहराच्या वतीने अनोखा आंदोलन करण्यात आले.
यावेळी या प्रशासनाचे करायचं काय? खड्ड्यात डोकं वर पाय* प्रशासनाच्या विरोधात अशा जोरदार घोषणा देत जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळेस पक्षाचे शेषराव वाघमारे (शहराध्यक्ष); उज्वल रतन महाले (युवा उपाध्यक्ष); सुरेंद्र तिडके (शहरउपाध्यक्ष); नितिन भालेराव (वार्ड अध्यक्ष) व इतर मोठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा