मनपाच्या ५/ड प्रभाग क्षेत्रात धोकादायक बिल्डिंग वर तोड़क कारवाई

 कल्याण डोम्बिवली तर्फे तोड़क कारवाई शुरूच

 


DT न्यूज़/स्वदेश मालवीय

कल्याण: मनपा आयुक्त यांच्या निर्देशानुसार व विभागीय उपायुक्त सौ. वंदना गुळवे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक: 29जुलाई 2022 रोजी ५/ड  प्रभागक्षेत्रातील खडेगोलवलीत परिसरात, नित्यानंद कॉलनी समोर,कल्याण पूर्व येथील  *न्यू सोनिया कॉलनी (ठाकूर बिल्डिंग) या नावाने ओळखली जाणारी तळ अधिक 1 मजल्याची अतिधोकादायक इमारत संबंधीतांनी दिलेल्या मुदतीत निष्कासित न केल्यामुळे सदर इमारतीवर निष्कासनाची कारवाई सुरू  करण्यात आली आहे.*


  सदर कारवाई अनाधिकृत बांधकाम विभागाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे मदतीने  सुरू करण्यात आली आहे. सदर कारवाईच्या वेळी सहाय्यक आयुक्त  सौ.सविता हिले  व पर्यवेक्षक तसेच प्रभाग कार्यालयातील अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथकातील कर्मचारी व फेरीवाला विभागाचे कर्मचारी तसेच महापालिका ठेकेदार यांचे कर्मचारी यांचे समवेत पोकलेन च्या सहाय्याने निष्कासन कारवाई सुरू करण्यात आली आहे.

टिप्पण्या