अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे तर्फे सुट्टीच्या दिवसीय ही कारवाई
कल्याण डोंबिवली महानगरपालिका तर्फे अनधिकृत बांधकाम कारवाई
DT न्यूज़/स्वदेश मालवीय
कल्याण : 3 जुलाई 2022 रोजी महापालिकेच्या 4/जे प्रभागातील ' साई कृपा अपार्टमेंट या तळ+3 मजल्याच्या आणि 2/ब प्रभागातील काळे बिल्डिंग या तळ+2 मजल्याच्या अतिधोकादायक इमारतीवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे.
उपअभियंता सुनील वैद्य, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी, कोळसेवाडी पोलीस स्टेशन अधिकारी/कर्मचारी, वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने आणि १ पोकलेन सहाय्याने निष्कासन करण्यात आली.
त्याचप्रमाणे २/ब प्रभागाचे सहा. आयुक्त किशोर ठाकूर यांनी कल्याण (प) रामबाग मेन रोड , ममता मेडिकल समोरील काळे बिल्डिंग या तळ + 2 मजल्याच्या अतिधोकादायक इमारतीवर काल निष्कासनाची कारवाई सुरू केली . सदर इमारतीस सन 2019 पासून नोटीस बजाण्यात येत होती. ही इमारत रहिवासमुक्त होती.
सदर कारवाई सहा. अभियंता प्रकाश मोरे, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने आणि 1 ब्रेकर व हातोड्याच्या सहाय्याने करण्यात येत आहे.




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा