मनपा सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभाग रचनेमध्ये सावळा गोंधळ: शैलेश धात्रक

 डोंबिवली शहरातील प्रभाग क्रमांक -३२ मधील गणेश मंदिर वगळलेले आहे.


DT न्यूज़/स्वदेश मालवीय

डोंबिवली :-कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेने अंतिम मतदार यादी जाहीर करून,३ जुलै पर्यंत हरकती नोंदविण्याचे जाहीर केले होते; परंतु डोंबिवली प्रभाग क्रमांक-३२ मध्ये प्रभाग रचनेत सावळा गोंधळ आढळून आल्याने भाजपाचे माजी नगर सेवक शैलेश धात्रक यांनी पत्रकार परिषद बोलावून हे प्रकरण जनतेसमोर आणले आहे.

                         पत्रकार परिषद

   प्रभाग क्रमांक-३२ चे गणेश मंदिर वगळल्याने  हरविल्याचा आरोप ही या परिषद मधे करण्यात आले  आहे. हे राजकीय हेतूने प्रेरित होऊन वगळल्याचा संशय असल्याचा खळबळजनक आरोप शैलेश धात्रक यांनी केलाय.या कारणाने स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष व नाराजी पसरली आहे. मनपा उप आयुक्त,निवडणूक विभाग यांना ३ जुलै रोजी लेखी निवेदन देऊन, हरकत नोंदवून आक्षेप घेतला आहे.

            शैलेश धात्रक- माजी नगर सेवक 

 आगामी मनपाच्या सार्वत्रिक पॅनल पद्धतीच्या निवडणुकीत ४४ प्रभागाची रचना केली गेली आहे.डोंबिवलीच्या प्रभाग क्रमांक- ३२ मध्ये,जयहिंद कॉलनी - गणेश मंदिराचा समावेश आहे.त्या प्रभागातील गणेश मंदिर वगळला असून, प्रभाग क्रमांक -२९,मोठगाव- ठाकुर्ली येथे गणेश मंदिराची चुकीची प्रभाग रचना करण्यात आल्याचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांनी तसा आरोप केला आहे. प्रभाग क्रमांक-३२ ची एकूण लोकसंख्या -३३,१४४ आहे.अनुसूचित जाती-८८९ व अनुसूचित जाती जमाती १५७ इतकी आहे.या लोकसंखेमधील पंधराशे ते दोन हजार मते प्रभाग क्रमांक-२९,मोठगाव-ठाकुर्ली मध्ये गेली कशी..? या संदर्भात मनपा ने प्रभाग रचनेची तात्काळ दुरुस्ती न केल्यास भाजपाचे माजी नगर सेवक -शैलेश धात्रक आंदोनल व उपोषण करण्याचा इशारा मनपा प्रशासनाला दिला आहे.

टिप्पण्या