खड्यात पडून मुलांची डोम्बिवलित दूसरी घटना

 लिफ्टसाठी खोदलेल्या खड्यात पडून लहान मुलाचा मृत्यू


 DT न्यूज़/स्वदेश मालवीय

डोम्बिवली : बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमध्ये लिफ्टसाठी खोदलेल्या खड्यात पडून एका सहा वर्षीय मुलाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना डोंबिवलीतील घडली आहे. वेदांत जाधव असे या मुलाचे नाव असून पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे. अशा प्रकारची ही दुसरी घटना असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

डोंबिवली पूर्व भागातील सांगर्ली परिसरात एका बहुमजली इमारतीचे काम सुरु आहे. या इमारतीमध्ये लिफ्ट बसविण्याकरीता खड्डा खोदण्यात आला होता.पाऊसाच्या वेळी या खड्यात पाणी भरलाय मुळे त्या सहा वर्षीय वेदांत ला याचा अंदाज आल्या नसेल मुळे तो एक बोल काढ़न्या करिता खड्यात उतला असेल अस प्रथमिक अंदाज वर्तवल्या जात आहे या मुळे वेदांत जाधव या खड्यात पडून मृत्यू झाला आहे. पाडा पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करीत आहेत. मुलाचा मृत्यू कधी आणि कशामुळे झाला आहे. हे पोलीस तपासाअंती समोर येणार आहे.

काही महिन्यापूर्वीच सागाव परिसरात असे एक बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमध्ये लिफ्टसाठी खोदलेल्या खड्यात पडून एका दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. या घटनेमध्ये पोलीस तपास करतील. त्र,घटनाग्रस्त इमारत बेकायदा कि अधिकृत याविषयीही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टिप्पण्या