मनसे मुळे सूचना, नावफल मराठीत बदल


कल्याण मध्ये इंग्रजी शाळा, हॉटेल, दुकाने ह्यांच्या फलक झाल्या मराठी 


DT न्यूज़/स्वदेश मालवीय

कल्याण - महाराष्ट्राची शान,आमची बोली, माय बोली "मराठी" भाषेचा सतत प्रचलन व्हावा, ह्या साठी राज्य सरकारने आदेश काढून सर्व संस्थानाचे नाव फलक मराठीत करण्याचे सूचित केले होते.पण राज्यात कुणीही ऐकले नाही व सरकारी खाते तर्फे कार्रवाई शुद्धा झाली नाही,मराठी भाषेचा वापर सगळी कडे व्हावा ह्या साठी मनसे चे आला तर्फे सर्वाना आव्हान करण्यात आले होते आणि जे सरकारला जमले नाही ते मनसे ने करून दाखविले.


मनसे चे कल्याण शहर संघटक रुपेश चंद्रकांत भोईर यांनी त्यांच्या विभागात असलेले न्यू श्री वाणी विद्यालय च्या संचालकांना शाळेचे नाव फलक मराठी भाषेत करण्यासाठी विनंती केली आणि त्या विनंती ला मान देऊन शाळेचे संचालक यांनी शाळेचे नाव फलक मराठीत भाषेत लावून मायबोली मराठीचा गौरव वाढविला.सोबत कल्याण मधील हॉटेल व्यावसायिक, दुकादारांनी सुद्धा आपल्या हॉटेल आणि दुकानाचे  फलक मराठी भाषेत केले. ह्या बाबतीत रुपेश चंद्रकांत भोईर म्हणाले की जे राज्य सरकारला जमलं नाही ते मनसे नी करून दाखविले . भोईर ह्यांनी न्यू श्री वाणी विद्यालय शाळेचे संचालक तसेच हॉटेल, दुकान व्यावसायिकांचे यांचे आभार व्यक्त केले आहे .

टिप्पण्या