मनपा तर्फे अनाधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई
जे प्रभागात अनाधिकृत बांधकामावर तर फ प्रभागात अनाधिकृत शेड्सवर निष्कासनाची कारवाई
DT न्यूज़/स्वदेश मालवीय
कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील प्रभाग जे मधील एका अनधिकृत बांधकामावर तर प्रभाग फ मध्ये एका अनधिकृत शेड वर पालिकेने धडक कारवाई करुन ही अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली .
जे प्रभागाच्या सहा.आयुक्त हेमा मुंबरकर यांनी कल्याण पूर्व, शिवाजीनगर येथील वालधुनी नदी किनारी असलेला अनाधिकृत गाळा निष्कासित करण्याची धडक कारवाई नुकतीच केली. सदर कारवाई अतिक्रमण निमुर्लन विभागाचे कर्मचारी, १ जेसीबी यांच्या सहाय्याने करण्यात आली.
तर फ प्रभागाचे सहा.आयुक्त संजय जाधव यांनी डोंबिवली स्टेशन ते ठाकुर्ली स्टेशन परिसरात, शहर विद्रुपीकरणात भर घालणाऱ्या पदपथांवरील सुमारे १२ अनाधिकृत शेड्सवर निष्कासनाची धडक कारवाई आज केली. सदर कारवाई पथक प्रमुख दिनेश वाघचौरे, अतिक्रमण निमुर्लन विभागाचे कर्मचारी व १ जेसीबी यांच्या सहाय्याने करण्यात आली.
प्रभाग ४ जे मधील चक्की नाका जवळील पूणे लिंक रोडच्या कडेला एक आर सी सी पक्क्या स्वरुपाचे बांधकाम चालु आहे, हे बांधकाम अधिकृत की अनधिकृत या बाबत परिसरातील नागरीकांत साशंकता व्यक्त केली जात असतांनाच हे बांधकाम अधिकृत असेल तर या अधिकृतते बाबतच्या माहीतीचा फलक या ठिकाणी का लावण्यात आला नाही असा प्रश्नही सुज्ञ नागरीकांत विचारला जात आहे .




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा