रस्त्यावरील खड्डे आणि पाणीच्या मुद्देवर कुणाल पाटील यांचा आंदोलनाचा इशारा
२७ गावातील रस्त्यावरील खड्डे आणि पाणीची समस्या सुटणार कधी
DT न्यूज़/स्वदेश मालवीय
कल्याण : २७ गावातील रस्त्यांची दुर्दश्या गेल्या काही वर्षांपासून होत आहे.विशेष म्हणजे पावसाळा सुरू झाला की जास्त करून,प्रभाग क्रमांक १०८ येथील आडीवली-ढोकळी या ग्रामीण भागातील रस्त्यावर पावसाळ्यात खड्यामुळे चिखलाचे साम्राज्य होऊ लागले आहे.स्थानिक माजी नगर सेवक कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी काका ढाबा येथे नुकतेच रास्तारोको,मोर्चा अशा मार्गाने मनपा प्रशासनाला सतत जागे करण्याचे प्रयत्न केले;परंतु स्थिती जैसे थे. २७ गावातील रस्त्यावरील खड्यांची समस्या आणि पाणी प्रश्न लवकर मार्गी लागला नाही;तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा कार्यसम्राट स्थानिक नगर सेवक कुणाल पाटील यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे.
आडीवली-ढोकळी ग्रामीण भागात रस्त्यावरील खड्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि नागरिकांना सतत नाहक त्रास सहन करावा लागत आहे.विशेष म्हणजे रस्त्याबरोबर या आडीवली-ढोकळी ग्रामीण रस्त्याच्या लगत असणाऱ्या नाल्याची रुंदी ही विकासकांच्या अनधिकृत बांधकांमुळे कमी होत असल्याने या ग्रामीण भागात पावसाळ्यात ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरू लागले आहे.दरम्यान याच अरुंद नाल्यात एका शाळकरी विध्यार्थ्यांचा अपघात होऊन ,डोक्याला मोठी दुखापत झाली होती. मोठे नाले,गटारे आणि रस्त्यांची समस्यांमुळे वाहतुकीच्या तीनचाकी ,मोटारसायकल गाड्यांचे नुकसान होऊ लागले आहे;परंतु या भागात प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप माजी नगर सेवक कुणाल पाटील यांनी केला आहे.
माजी नगर सेवक कुणाल पाटील


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा