दिपेश म्हात्रे फाऊंडेशनच्या वतीने सामाजिक संदेश देणे साठी भव्य दहिहंडी

 कर्णबधीर गोविंदा पथके साठी डोम्बिवलित दहिहंडी

DT न्यूज़/स्वदेश मालवीय

कल्याण-कर्णबधीर गोविंदा पथके साठी या वेळी डोंबिवली शहराच्या पश्चिम भागातील सम्राट चौकात  दहिहंडी उत्सव केली जाणार आहे ,ही सामाजिक संदेश देणारी भव्य दहिहंडी दिपेश म्हात्रे फाऊंडेशनच्या वतीने साजरी केली जाणार आहे, असल्याची माहिती फाऊंडेशनचे प्रमुख दिपेश म्हात्रे यांनी दिली आहे.

              दिपेश म्हात्रे फाऊंडेशन प्रमुख

डोंबिवलीतील संवाद कर्ण बधीर शाळा शाळेच्या प्रमुख अर्पणा आगाशे चालवितात. या कर्णबधीर शाळेतील विद्यार्थी हंडी फोडून उत्सवाची सुरुवात करणार आहे. या हंडीचे स्वरुप लहान असेल. ही हंडी कमी उंचीवरील असेल , त्यातून सामाजिक संदेश दिला जाणार आहे. एक हंडी डोंबिवलीतील, दुसरी मुंबईतीली गोविंद पथकाकरीता बांधली जाईल. तिसरी हंडी महिला गोविंद पथकाकरीता बांधली जाईल.या दहीहंडी उत्सव मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार शिंदे यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात अनेक सेलब्रिटी देखील उपस्थित राहणार आहे.

                          दिपेश म्हात्रे

 कल्याण डोंबिवलीसह मुंबईतून जवळपास ८० पेक्षा जास्त गोविंदा पथके हंडी फोडण्यासाठी येणार आहे. सगळ्य़ात वरच्या थरावर चढणाऱ्या लहान गोविंदाला सेफ्टी बेल्ट दिला जाणार आहे.

जिवित सुरक्षिततेची सर्व प्रकारची काळजी घेतली जाणार आहे. कोणालाही इजा पोहचणार नाही अशा प्रकारे हा उत्सव साजरा केला जाणार आहे. सहभागी होणाऱ्या गोविंदांचा सत्कार केला जाईल. तसेच प्रमाणपत्र दिले जाणार आहे. डोम्बिवलीच्या पश्चिम भागातील सम्राट चौकात हंडी उभारली जाणार असून हा रस्ता वाहतूकीसाठी बंद ठेवला जाईल. अन्य पर्यायी रस्त्याने वाहतूक केली जाईल. वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी फाऊंडेशनच्या वतीने वाहतूक पोलिसांच्या मदतीला  वाहतूक वॉर्डन पूरविले जाणार आहे. अशी माहिती फाऊंडेशनच्या प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे.

टिप्पण्या