काँग्रेसचा खड्यांसाठी पालिकेवर आंदोलनात्मक मोर्चा
रस्त्यांच्या खड्यासाठी पुन्हा राजकारण्यांचे आंदोलन पेटले
DT न्यूज़/स्वदेश मालवीय
कल्याण : कल्याण शहरात खड्यांमुळे वाहतूक रस्त्यांची स्थिती अत्यंत खराब असल्याने कल्याण-डोंबिवली शहर जिल्ह्या काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सलीम शेख यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर आंदोलनात्मक देण्यात आला, मनपाच्या धीम्या कारभारविरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला.
रस्त्यावरील खड्डे भरण्याची कामे श्री. गणेशोत्सवापूर्वी करावीत अशी पुनः मागणी मोर्चा द्वारे करण्यात आला,या मोर्चात काँग्रेसचे स्थानिक नेते संतोष केणे,अजय पौळकर,शिफा मेहशर,अशपाक शेख,फिरोज सैयद,रियाज चौधरी,मतलुब शेख तसेच काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते सामील झाले होते.
या बैठकीनंतर तात्काळ मनपा आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी आत्याधुनिक पद्धतीने खड्डे भरण्याचा आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकांची पाहणी केली.
या पद्धती मध्ये विविध ॲडमिक्श्चर्सचा अंतर्भाव असलेले स्पेशल काँक्रीट तयार करुन, ते खड्डयामध्ये भरले जाते आणि ते साधारण पणे ४५ मिनिटे ते १तासात पूर्ण सेट होते आणि ६ तासानंतर सदर रस्ता वाहतूकीसाठी खुला करता येतो परंतू सदर पध्दतीने भरलेले खड्डे दिर्घकाल टिकतात अशी माहिती संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीने आयुक्त डॉ.दांगडे यांना दिली.
कल्याण-डोंबिवलीच्या बैल बाजार ते वल्लीपीर रोड,चिराग हॉटेल पर्यंत वाहतूक रस्त्यांची अत्यंत वाईट दुर्दशा असल्याने मनपाच्या धीम्या कारभाराचा काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाने निषेध व्यक्त करून हा आंदोलनात्मक मोर्चा काढला.
कांग्रेस नेते संतोष केणेमात्र आठवड्याभरात या रस्त्यावरील खड्डे भरण्यात आली नाही तर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल अशी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागातर्फे मनपा प्रशासनाला इशारा देते निवेदन पत्र ही देण्यात आला आहे.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा