जीवनदीप महाविद्यालयात पौगंडावस्थेतील मुलींसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन
पौगंडावस्थेत साठी विद्यार्थिनींना मार्गदर्शन
DT न्यूज़/स्वदेश मालवीय
कल्याण: जीवनदीप महाविद्यालय अंतर्गत दि.३ ऑगस्ट रोजी पौगडावस्थेतील मुलींसाठी तारुण्य विषयक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या वेळी डॉ. प्राजक्ता भोईर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले, पौगंडावस्थेत शरीरात काय बदल होतात आणि कशाप्रकारे शरीरात बदल घडून येतात मुलींनी कशाप्रकारे स्वतः ची काळजी घ्यायला हवी ,आहार कसा घ्यायला हवा हे सांगितले.
सेंचुरी रेऑन टीम चे महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले..
यांनतर महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांनी मार्गदर्शन केले..तसेच अनिता सोनार यांनीही महाविद्यालयातील विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.महाविद्यालयाच्या ३५० हून अधिक ज्युनियर विद्यार्थीनींनी कार्यक्रमात सहभाग दर्शवला होता.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शीतल सुरोशी यांनी केले..
तसेच उपस्थित सर्व विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकीन वाटप करण्यात आले.




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा