साई इंग्लिश स्कूल मध्ये प्रशासनामध्ये राडा
परस्पर विरोधात विनय भंगाचा गुन्हा दाखल
DT न्युज/वार्ताहर
कल्याण : कल्याणच्या साई शाळेत लावण्यात आलेल्या शाळेच्या जमिनीच्या हक्काच्या फलकावरून शाळा प्रशासनातील दोन गट समोरासमोर आले. दोघांमध्ये शिवीगाळ, बाचाबाची झाली, आता हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले. तिथे दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
स्वर्ण लक्ष्मीगिरी बाबू आणि त्यांची पत्नी स्वर्णलक्ष्मी गिरी बाबू आणि काही साथीदार गुरुवारी सायंकाळी 5.30 च्या दरम्यान कल्याण पूर्वेतील काटेमानेवली नाका येथील साई शाळेत पोहोचले. चौकशीत त्यांना शाळेचा जमिनीचा हक्काचा फलक काढलेला आढळून आला, समोर उभ्या असलेल्या मैथिली वेरीवेटी या दुसऱ्या दावेदाराने समोर येताच शाळेच्या कामात ढवळाढवळ करू नये अशी बाचाबाची सुरू झाली आणि एकमेकांशी भांडण झाले त्यानंतर शिवीगाळ करून हाणामारी सुरू झाली..
तक्रार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात पोहोचली, पोलिसांना ही बाब समजताच दोन्ही पक्षांविरुद्ध पोलीस ठाण्यात ट्रेस पासिंग, विनयभंग, धमकावणे आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मैथिली विरीवेटी यांनी माध्यमांशी बोलताना दिली।ऐकूया काय म्हणाले मैथिली
मैथिली विरीवेटी
याच घटनेदरम्यान स्वर्णलक्ष्मी गिरी बाबू यांनी दिपक रामराव पाटील, रमेश चव्हाण, मैथिली वि रीवेटी, श्रीलक्ष्मी मुद्दूरु यांच्या विरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा विनयभंग व धमकावल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
सीसीटीव्हीआता या घटनेचा तपास कोळसेवाडी पोलिस मिळालेल्या सिसिटीव्ही च्या आधारे ही तपास करतात आहे ,आता आरोपींवर अटकेची टांगती तलवार दिसत आहे।



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा