प्लास्टीक व घनकचरा व्यवस्थापन जनजागृती बाबत विशेष बैठक
एकल व्यापार प्लास्टिक वर कायमची बंदी.
DT न्यूज़/स्वदेश मालवीय
कल्याण : एकल व्यापार प्लॅस्टिक वर आता कायमची बंदी करण्यात आली आहे.यासाठी मनपा प्रशासनाचे अधिकारी प्लास्टिक पिशवी तसेच इतर प्लस्टिकचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करून आर्थिक दंड वसूल करण्याच्या तयारीला लागली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत नुकतीच उप आयुक्त, अतुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली "एकल वापर प्लास्टीक"बंदी व घनकचरा व्यवस्थापन जनजागृती बाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या विषया वर काय म्हणाले उपायुक्त अतुल पाटील ऐकूया.
केडीएमसी उपायुक्त अतुल पाटीलएकल व्यापार प्लास्टिक वर बंदी या बैठकीत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी कुळकर्णी आणि त्यांचे सहकारी, कल्याण डोंबिवली व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष, प्रतिनिधी, फेरीवाले संघटनेचे अध्यक्ष व प्रतिनिधी, हॉटेल व्यावसायिक असोसिएशनचे प्रतिनिधी, सामाजिक संस्था, महिला बचत गट व इतर संस्थेचे प्रतिनिधी तसेच महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकारी, उप मुख्य स्वच्छता अधिकारी, सर्व प्रभागाचे स्वच्छता अधिकारी तसेच स्वच्छता निरिक्षक, मुकादम, इत्यादी उपस्थित राहिले होते.
१ जुलै २०२२ पासून केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या आदेशानुसार "एकल वापर प्लास्टीक” बंदीबाबत महापालिकेची कारवाई सुरू आहे. त्यामुळे उघडयावर कचरा टाकु नये, प्लास्टीकचा वापर करू नये अन्यथा "एकल वापर प्लास्टीक" बंदी नुसार पहिल्या वेळेस रू ५,०००/- दंड, दुसऱ्या वेळेस रू १०,०००/- दंड, आणि तिसऱ्या वेळेस रू २५,०००/- दंड व पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविणे याची नियमात तरतूद असल्यामुळे महापालिका क्षेत्रातील व्यापारी, फेरीवाले, हॉटेल व्यावसायिक यांनी नोंद घेऊन एकल प्लास्टिकचा वापर कटाक्षाने टाळावा असे आवाहन घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी उपस्थितांना केले त्याचप्रमाणे सविस्तर मार्गदर्शनही केले.
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांनी सुध्दा या विषयाबाबत योग्य मार्गदर्शन केले. “एकल वापर प्लास्टिक" बंदीबाबत जनजागृती कार्यक्रम शालेय विद्यार्थी, व्यापारी संघटना, फेरीवाले संघटना यांच्यामध्ये वारंवार राबविण्याचे सुचित करत "एकल वापर प्लास्टीक" न वापरण्याची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.





टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा