Relaibale Acedemy तर्फे 1000 विद्यार्थ्यांना प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी शिष्यवृत्ती जाहीर
रिलायबल अकॅडमीने दिले हाय-टेक व्ही-सॅट वर एज्युकेशन प्रोग्राम
DT न्यूज़/स्वदेश मालविय
मुंबई: रिलायबल अकॅडमी द्वारे UPSC, BANK, IAS, SSC, MPSC, RAILWAY , अन्य स्पर्धा परीक्षांसाठी हाय टेक, V-SAT चे भव्य लाँचिंग मुंबईत स्टार सहारा हॉटेलमध्ये करण्यात आले.याचा लाभ ग्रामीणच्या विद्यर्थियांना होईल.
या ग्रँड लाँचिंगला टाटा नेल्कोसह मुंबईतील टॉप 100 कॉलेजेसचे प्रतिनिधी उपस्थित होते. रवींद्र शिवसे स्पेसल आयजी महाराष्ट्र राज्य (मानवाधिकार आयोग), संजय गुप्ता, तांत्रिक प्रमुख, टाटा नेल्को, विविध एज्युकेशन सेंटरचे विनोद गुप्ता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रिलायबल अकॅडमीचे संस्थापक मनोहर पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
महाराष्ट्रातील इतर राज्यांच्या तुलनेत कॉलेजमधूनच IAS, IPS, इतर स्पर्धा, परीक्षांची तयारी करणे व ही सेटलाइट द्वारे ऑनलाइन सेवा असेल त्याचा ग्रामीण रहिवासियांना खुप फायदेशी ठरेल, हा या भव्य शुभारंभाचा मुख्य उद्देश होता . याठिकाणी उपस्थित असलेल्या मुंबईतील टॉप 100 कॉलेजेसच्या प्रतिनिधींनी स्पर्धा परीक्षा तयारी संदर्भातील प्रश्न विचारले रिलायबल अकॅडमीच्या या कार्यक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाला आयपीएस रवींद्र शिसवे यांचेही मार्गदर्शन लाभले.
रवींद्र शिसवे
(विशेष महानिरीक्षक, महाराष्ट्र)
या कार्यक्रमादरम्यान रिलायबल अकॅडमीचे संस्थापक मनोहर पाटिल यानी 100 कॉलेज मधील प्रत्येकी 10 गरीब विद्यार्थ्यांना म्हणजेच 1000 स्पर्धा परीक्षा शिक्षण घेणाऱ्याना मोफत शिक्षण देणार असे जाहिर करुन कार्यक्रमा बाबत आपला उद्देश्य व्यक्त केला .
मनोहर पाटील
(रिलायबल अकॅडमी,संस्थापक)



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा