डोंबिवलीत रेल्वेची संक्षरक भिंत कोसळून 2मजुरांचा मृत्यू ,तर 3 मजूर जखमी
भिंत कोसळून पाच मजूर जखमी झाल्याची घटना
DT न्यूज़/स्वदेश मालवीय
डोंबिवली: डोंबिवलीतील सिद्धार्थनगर परिसरात रेल्वेच्या संरक्षक भिंतीचे काम सुरु असताना भिंत कोसळून पाच मजूर जखमी झाल्याची घटना घडली त्यापैकी दोन मजुरांच्या मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनास्थळी तातडीने केडीएमसीचे अग्नीशमन पथक दाखल झाले असून जखमी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
संध्याकाळी साडे चार वाजताच्या दरम्यान भिंत अचानक कोसळली. यात भिंतीच्या ढिगाऱ्याखाली पाच मजूर अडकले होते. स्थानिक नागरीकांच्या मदतीने जखमी मजूरांना बाहेर काढण्यात आले.
जखमींना डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णलायात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले, जखमींमध्ये माणिक पवार, विनायक चौधरी, युवराज गुत्तवार, बंडू कोवासे आणि मल्लेश यांचा समावेश आहे. दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अजून या संदर्भात अधिकृत मिळू शकली नाही . नक्की हा अपघात कसा झाला याचा तपास पोलिसांकडून सुरु झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.... शरद शिंदे , आदिराज मिडिया, डोंबिवली..



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा