बीएस्सीसोबत स्कील डेव्हलपमेंट केले पाहिजे:- शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  जीवदीप शैक्षणिक संस्थेच्या वतीने किर्तनकारांचा जाहिर सत्कार 


DT न्यूज़/स्वदेश मालविय

कल्याण:  बीए. बीएस्सी करुन चालणार नाही. हे सामान्य ज्ञान आहे.  बीएस्सीसोबत स्कील  डेव्हलपमेंट केले पाहिजे. ज्यामुळे ज्ञान आणि कौशल्य वाढणार. त्याचा फायदा तरुणाना रोजगारासाठी होणार याकडे ही उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तर यांनी लक्ष वेधले आहे

   
 चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री

कल्याण तालुक्यातील गोवेली येथील जीवदीप शैक्षणिक संस्थेच्या वतीने परिसरातील किर्तनकारांचा जाहिर सत्कार सोहळा आज आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी भाजपचे आमदार किसन कथोरे, कुमार  आयलानी, माजी आमदार नरेंद्र पवार आणि जीवनदीप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे आदी मान्यवर उपस्थि होते. 

यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिक्षणासोबत स्कील डेव्हलमेंटवर भर दिला पाहिजे. त्यासाठी आम्ही त्यांना फंड देऊ. अतिशय दुर्गम भागात संस्थेचे अध्यक्ष घोडविंदे यांनी शिक्षण संस्था उभी केली. या भागातील विद्याथ्र्याची गरज पाहता या भागाला लॉ कॉलेज दिले आहे.  ग्रामीण भागात आर्टस सायन्स, बीएस्सीचे शिक्षण घेऊन काय होणार नाही. ती एक समाजाची छोटी गरज आहे. या विषयांचे ज्ञान आणि त्याला स्कील डेव्हलमेटंची जोड दिल्यास एका बाजूने तरुण बुद्धीमान होईल तर दुस:या बाजूने त्याला रोजगार मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

टिप्पण्या