मनसे पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न

मनसे व सावित्री प्रतिष्ठान वआणि कलकी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नपूर्णा पाककला स्पर्धेचे आयोजन


DT न्यूज़/स्वदेश मालवीय

 कल्याण- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शनिवारी कल्याणमध्ये अन्नपूर्णा पाककला स्पर्धा २०२२ चे आयोजन करण्यात आले होते.  मनसे व सावित्री प्रतिष्ठान व कलकी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नपूर्णा पाककला स्पर्धेचे आयोजन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने व शालिनी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.  

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रज्ञा कदम (सोशल मीडिया स्टार) यांचा गौरव करण्यात आला.  मास्टर शेफ शीतल जाधव ,सायली पंड्या यांना आमंत्रित करण्यात आले होते. 

 ह्या कार्यक्रमाचा संपूर्ण कार्यभार  महारष्ट्र नवनिर्माण सेना च्या महिला शहर अध्यक्ष सौ.शितल विखणकर तसेच चेतना रामचंद्रन व पुरुष पदाधिकारी माननीय माजी आमदार प्रकाश भोईर,जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर, शहर अध्यक्ष कोशतुभ देसाई.उपशहर अध्यक्ष गणेश चौधरी,शहर संघटक रुपेश चंद्रकांत भोईर  व तसेच महिला सेना, विद्यार्थी सेना व इतर पदाधिकारी मनसैनिक यांच्या हस्ते जल्लोषात पार पाडला.

गायिका अपर्णा पलटणकर, दीप्ती सुर्वे, लावणी कलाकार सुमित दळवी यांनी कार्यक्रमात रंगत वाढवली.  कल्याण विधानसभा मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेबाबत बोलताना मनसेचे शहर संघटक रुपेश चंद्रकांत भोईर म्हणाले की, अन्नपूर्णा पाककला स्पर्धेत मुस्लिम महिलांनीही सहभाग नोंदवून स्पर्धेत वेगळीच रंगत आणली.  स्पर्धेत शाहिद शेख या महिलेने पाचवा क्रमांक मिळवून प्रभाग क्रमांक 36 (बेल बाजार) चे नाव रोशन केले आहे.  भोईर यांनी महिलांनी जास्तीत जास्त अर्ज भरून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले.

टिप्पण्या