सावधान ,हाई प्रोफाइल चोरटाचा हा चेहरा लक्षात ठेवा.

कल्याणच्या मेट्रो मॉल मधे हजारों ची चोरी 

DT न्यूज़/स्वदेश मालवीय

कल्याण : 17 तारखेला एका तरुणांनी तोंडावर मास्क वापरून चक्क  कल्याणच्या मेट्रो मॉल मध्ये जवळपास 30 ते 35 हजार रुपये किमतीचे रिलायन्स कंपनीच्या इयर बर्ड्सची चोरी केल्याची घटना घडली आहे ,आणि घटना सीसीटीवीत कैद झाली असून कोळसेवाडी पोलिसांनी या अज्ञात इसमाचा तपास सुरू केला आहे, जर हा हाय प्रोफाईल चोरटा कुठे दिसल्यास कोळसेवाडी  पोलिसांशी संपर्क साधावा असे आह्वान ही पोलिस तर्फे करण्यात आला आहे.

कल्याण मेट्रो मॉल मध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह आपल्या जवळ नसलेला पाहून , त्याने लागलीच आपल्या पिशवीमध्ये ऐवज घेवून हा चोरटा पसार झाला आहे..

तेव्हा व्यापाऱ्यांनो सावधान हा चेहरा लक्षात ठेवा ! आणि दिसल्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे , दूरध्वनी क्रमांक 777 40 55 700 कोळसेवाडी पोलीस ठाणे यांच्याशी तात्काळ संपर्क करावा..

टिप्पण्या