डॉक्टरावर रोगराई पसवण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल

 बदलापूर- अंबरनाथ  रस्त्यावर बायोमेट्रिक वेस्ट टाकल्यामुळे डॉक्टरवर गुन्हा दाखल.

DT न्यूज़/स्वदेश मालविय
अंबरनाथ : अंबरनाथ स्थित डॉ. जुबेर शहा हॉस्पिटल अँड पॉलिटेक्निक ओल्ड हजरा हजन हॉस्पिटल यांच्यावर  संयुक्त भारत पक्षाचे विनोद साळवे यांच्या तक्रारीवरून 21सप्टेंबर रोजी रस्त्यावर  सार्वजनिक ठिकाणी बायोमेट्रिक वेस्टेज टाकल्यामुळे निष्काळजीपणाचा, रोगराई पसवण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
.

अंबरनाथ आरोग्य विभाग निरीक्षक यांनी घटना स्थली जाउंन सहानिषा करून तपास केली त्या नन्तर हा गुन्हा दाखल शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे करण्यात आला आहे.


संयुक्त भारत पक्षाचे राष्ट्रीय  संस्थापक /अध्यक्ष अशोक बहाद्दरे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर , पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विनोद साळवे यांनी संबंधित ठिकाणे वरची पाहणी करून तक्रार अर्ज दाखल केला होता, याची तत्काळ दखल घेत ,अंबरनाथ प्राथमिक तपास करून अंबरनाथ नगरपालिका आरोग्य विभागाने शिवाजीनगर पोलीस ठाणे, हद्दीतील डॉक्टर जुबेर शहा यांच्यावर अनेक आयपिसी नुसार गुन्हा दाखल करून बायोमेट्रिक वेस्टेजचे व्हिडिओ चित्रीकरण करून तपास सुरू केला आहे.

 त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका उत्पन्न होईल असा प्रकार घडत असलेल्या ठिकाणी नक्कीच चाप मिळेल असे संयुक्त भारत पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अशोक बहाद्दरे यांनी सांगितले.

टिप्पण्या