नवऱ्याच्या आत्महत्येस जबाबदार आरोपींच्या वर कारवाई करा, अन्यथा आम्हाला विष द्या
व्यावसायात होत असलेल्या त्रसा कंटाळून व्यावसायिक यानी केली आत्महत्त्या
DT न्यूज़/स्वदेश मालविय
कल्याण: तीन दिवसापूर्वी व्यावसायात होत असलेल्या त्रसा कंटाळून केबल व्यावसायिक यानी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी व्हीडीओ आणि सुसाईड नोट तयार केली होती. डोंबिवली जीआरपीने पंधरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.मात्र नवऱ्याच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या आरोपींच्या विरोधात ठोस कारवाई करण्यात यावी.
डोंबिवलीतील संदप गावात राहणा:या प्रल्हाद पाटील या व्यक्तीने दातिवली आणि निळजे स्टेशन दरम्यान रेल्वे खाली उडी मारुन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्याने व्हीडीओ तयार करुन सुसाईड नोट लिहीली होती. या व्हीडीओत त्याने त्याला होत असलेल्या छळाची व्यथा मांडली. यासाठी जबाबदार पंधरा जणांच्या विरोधात ठाणो जीआरपीने गुन्हा दाखल केला होता. यात संदीप माळीसह पंधरा जणांच्या समावेश आहे. ठाणे जीआरपीने गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरु केला आहे. यातील काहीआरोपींना अटक पूर्व जमीन मिळाला आहे. मात्र प्रल्हाद पाटील यांच्या पत्नी स्वप्ना यांनी न्यायासाठी आवाहन केले आहे



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा