अध्यक्ष निवडणे हा काँग्रेसचा अंतर्गत वादआहे: कपिल पाटील

गांधी घराणे हे सांगेल ते होणार परंतु आता अशी परिस्थिती राहिलेली नाही: -केंद्रीय मंत्री कपिल पाटील 


DT न्यूज/स्वदेश मालवीय

कल्याण: अध्यक्ष निवडणे हा काँग्रेसचा अंतर्गत वादआहे. मात्र भाजपच्या अध्यक्षपदी निवडनुकात कुठला ही वाद होत नाही , काँग्रेसमध्ये अशी परंपरा होती की पूर्वी गांधी घराणे हे सांगेल ते होणार. परंतु आता अशी परिस्थिती राहिलेली नाही, ज्याला अध्यक्ष करायचे होते त्यांनी अध्यक्षपद फॉर्म भरण्याची तारीख ,भूमिकाही जाहीर केली आणि मुख्यमंत्रीपद  सोडायला लागू नये म्हणून वेगळी चालही केली. सध्या निर्माण झालेली ही परिस्थिती पाहता काँग्रेसवर आता कोणाचाही कंट्रोल राहिलेला नाहीय, केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी सांगितले

                 केंद्रीय मंत्री कपिल पाटील

तर दररोज वेगवेगळी नावे आपल्याला बघायला मिळत आहेत.एक ठिकाणी भारत जोड़ो यात्रा चालू आहे तर दूसरे बाजू अध्यक्षपदाची निवडणूक,,मोदी जीना आव्हान देण्यासाठी लढवत असल्या शक्कल आता त्यांच्यावरच उलटु लागते आहे.अशी मिश्किल टीका केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याणात केली. कल्याण पश्चिमेतील मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्या नवरात्रौत्सव कार्यक्रमाला भेट दिली. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी ही मिश्किल टीका केली. 


इकडे भारत जोडो आंदोलन सुरू आहे आणि तिकडे काँग्रेस तुटायला लागली आहे. भारत जोडायचा की काँग्रेस जोडायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकल्याचेही पाटील यांनी सांगितले. 

तसेच भारत जोडो अभियान ते राबवत आहेत. मात्र भारताला कोणी तोडले आहे? असा सवाल उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत अखंड आहे. यापूर्वी पाचशे वर्षांपूर्वी जो भारत होता तो अखंड भारत करण्याचे काम आपण करत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. काँग्रेसने भारताचे विभाजन केले असून भारत जोडो करण्याआधी त्यांनी पाकिस्तानला भारताला जोडले पाहिजे होते. लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी आता काँग्रेसची काय परिस्थिती झालेली आहे हे जनतेला माहिती आहे. अस घणाघातही त्यांनी यावेळी केला.

यावेळी त्यांच्यासोबत कल्याण पश्चिमेतील मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्या नवरात्रौत्सव कार्यक्रमाला भेटिला माजी आमदार नरेंद्र पवार, नगरसेवक वरुण पाटील, शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, दया गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या