दोन दिवसीय भव्य कॅरम स्पर्धेचे आयोजनाचे उद्घाटन
स्वराज्य प्रतिष्ठान आणि एन. पी. अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने भव्य कॅरम स्पर्धा.
कल्याण पूर्वेला दोन दिवसीय भव्य कॅरम स्पर्धेचे आयोजनाचे उद्घाटन
DT न्यूज/स्वदेश मालवीय
कल्याण: कल्याण पूर्व चिंचपाडारोड गणेश नगर येथे शिवछत्रपती पुरस्कार विजेते 2018 पंकज अशोक पवार यांनी पी एम कॅरम अकॅडमीची उभारणी केली आहे, कल्याण पूर्व येथील स्वर्गीय माजी नगरसेवक हनुमान पावशे त्यांच्या सुपुत्र संदीप पावशे व सागर पावशे यांच्या स्वराज्य प्रतिष्ठान तर्फे दोन दिवसीय भव्य कॅरम स्पर्धेचे आयोजनाचे उद्घाटन फित कल्याण शिवसेना शहर प्रमुख शरद पाटील यांच्या हस्ते कापून तर समाजसेवक अमिताभ सिंग यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले,
या कार्यक्रमाच्या वेळेस शिवसेना शहरप्रमुख शरद पाटील, हर्षवर्धन पलांडे, स्थानिक माजी नगरसेविका शितल मंढारी, अमिताभ सिंग, स्वराज्य प्रतिष्ठानचे संदीप पावशे, सागर पावशे, सोबतच शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि कॅरम खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळेस कॅरम स्पर्धेचे कॅरम बोर्ड वर स्ट्रायकर मारून मान्यवरांनी उद्घाटन केले.. या कार्यक्रमात आयोजकांकडून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा