उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे समर्थना मशाल रैली
कल्याण पूर्वेत शिवसेना भव्य मशाल रॅलीचे आयोजन
DT न्यूज़/स्वदेश मालवीय
कल्याण: शिवसेनेला निवडणूक आयोगाकडून मशाल हे निवडणूक चिन्ह दिल्या नंतर सर्वत्र मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, कल्याण पूर्व शहर" शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे" यांच्या वतीने देखील भव्य स्मशाल रॅली काढण्यात आली, कोळसेवाडी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून शिवाजी कॉलनी ते तिसगाव नाका , ते तिसगाव शाखा पर्यंत या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते,
या रॅलीत मशाल मराठी माणसाची, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हीच मराठी माणसाची आणि हिंदुत्वाचा ध्यास घेणारी,शिवसेना आहे .अश्या घोषणा देत मशाल हाती घेऊन भव्य स्मशाल रॅलीचे नेतृत्व कल्याण पूर्व शहरच्या वतीने करण्यात आले.
या रॅलीत हर्षवर्धन पालांडे उप जिल्हाप्रमुख कल्याण पूर्व विधानसभा , रमाकांत देवळेकर संपर्कप्रमुख विधानसभा क्षेत्र कल्याण पूर्व, शरद पाटील कल्याण पूर्व शहर प्रमुख नारायण पाटील-विधानसभा प्रमुख कल्याण पूर्व, शांताराम डिघे-
उप शहर संघटक, विजया पोटे महिला जिल्हा संघटक, आशा रसाळ-उप शहर संघटक, पल्लवी बांदिवडेकर उपशहर संघटक , मीना माळवे, प्रकाश जाधव उपशहरप्रमुख कल्याण पूर्व, पुरुषोत्तम चव्हाण माजी नगरसेवक, माजी नगरसेवक रामभाऊ ओव्हाळ, दीपक आजगावकर उपविभाग प्रमुख, नितीन मोकल, कमलाकर इंदलकर, योगेंद्र यादव, वैभव घाडगे, हेमंत चौधरी, तेजश्री शरद पाटील युवतीसेना ,संगीता गांधी, महिला आघाडी पदाधिकारी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा