डी वाय फाउंडेशनच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
सामान्य नागरिकांना प्रश्न मांडण्यासाठी डी वाय फाउंडेशन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
DT न्यूज़/स्वदेश मालवीय
ठाणे : गेली अनेक वर्षे सामाजिक बांधिलकीचे नाते जपणारे डी वाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक दयानंद चोरघे यांनी समाजकार्यात आणखी एक पाऊल पुढे टाकत विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर डी वाय फाउंडेशन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले.
ही संस्था संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सामाजिक, सांस्कृतिक तसेच शैक्षणिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असून कोरोनाकाळातही संस्थेच्या माध्यमातून नागरिकांनाआर्थिक शैक्षणिक तसेच सर्वतोपरी मदत झाली . या कार्यालयाद्वारे जनतेला समस्या समाधानासाठी एक हक्काचे स्थान मिळाले असून डी वाय फाऊंडेशन कायम सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व इतर अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवत राहिल, असे प्रतिपादन चोरघे यांनी उद्घाटन प्रसंगी केले. तसेच बंधुत्व व मानवतेची कास धरुन भिवंडी ग्रामीण परिसराचा सर्वांगीण विकास हे ध्येय असल्याचे युवा काँग्रेस महाराष्ट्र राज्य सरचिटणीस विरेन दयानंद चोरघे यांनी स्पष्ट केले.
विरेन दयानंद चोरघेदयानंद चोरघें यांनी फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक गरजू लोकांना कोणताही गाजावाजा न करता सामाजिक कामात सर्वात पुढे उभे राहून त्या कार्याचा पाठपुरावा करून लोकांना मदतीचा हात देत आहेत याच फाऊंडेशन च्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्याला हातभार लागण्यासाठी व सर्व सामान्य नागरिकांना प्रश्न मांडण्यासाठी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले असल्याची स्पष्टोक्ती प्रदेशाध्यक्ष योगेश पाटील यांनी केली आहे




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा