संकेश भोईर तर्फे आधार कार्ड आणि सुकन्या समृद्धी योजना शिबिर
१३ ते १५ ऑक्टोबर दरम्यान संकेश भोईर यांच्यावतीने विविध योजना शिबिर
DT न्यूज/स्वदेश मालवीय
कल्याण : शिवसेना विभाग क्रमांक १० चिकनघर गावठाण मध्ये शिवसैनिक तथा आर बी ग्रुपचे संकेश रघुनाथ भोईर यांच्यावतीने नवीन आधारकार्ड शिबिर तसेच सुकन्या योजना समृद्धी योजनाच्या ३ दिवशी शिबिराचे आयोजन चिकनघर शिवसेना जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले आहे.
१३ ऑक्टोबर ते १५ तारखेपर्यंत या शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून पहिल्याच दिवसापासून शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. नवीन आधार कार्ड शिबिरात नवीन आधार नोंदणी , आधार कार्ड दुरुस्ती, मोबाईल नंबर बदलणे,फोटो,जन्म दिनांक बदलणे आदींचा समावेश आहे. तर आर बी ग्रुपचे संकेश रघुनाथ भोईर यांनी या बाबत काय सांगितले .
तर आपल्या कन्येच्या उज्वल भविष्यासाठी सुकन्या बँक खाते उघडून कन्येच्या पुढील भविष्यात विविध योजना संकेश भोईर यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. संकेश भोईर हे सेनेच्या वतीने प्रभागातील नागरिकांसाठी विविध शिबिरांचे आयोजन करीत आले आहेत. नागरिकांच्या मूलभूत समस्या लक्षात घेऊन भोईर प्रभागात विविध सोयी सुविधा तसेच योजना नागरिकांपर्यंत वेळोवेळी पुरवीत आले आहे त्याबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानले .



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा