कल्याणमध्ये दारू आणि बिर्याणी खाऊ घालून खून
कल्याण येथे आर्थिक वादातून एकाचा मृत्यू
डीटी न्यूज/स्वदेश मालवीय
कल्याण : कल्याण पूर्वेतील तिसगाव नाक्याजवळ एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली असून, बिपीन दुबे असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिस सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून ही हत्या झाली आहे.
राजेश्वर पांडे असे मारेकऱ्याचे नाव असून, त्याने बिपिन दुबेला घरी बोलावले, त्यानंतर दारू आणि बिर्याणी एकत्र खाल्ली, त्यानंतर ४ लाखचा आर्थिक व्यवहार वरुन दोघात वाद निर्माण झाला त्यात बिपिनची हत्या करण्यात आली.
त्यानंतर पोलिसांना फोन करून हत्येची कबुली दिली. कल्याण पूर्वेतील हत्येप्रकरणी पोलिसांनी एफआईआर दर्ज करून राजेश्वर पांडेला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा