३/क' व '५/ड' प्रभागातील अतिधोकादायक बांधकामावर धडक कारवाई

आकाश महल" अतिधोकादायक इमारत निष्कासित

DT न्यूज़/स्वदेश मालवीय

कल्याण: महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांचे निर्देशानुसार *३/क प्रभागाचे* सहा. आयुक्त संजयकुमार कुमावत व तसेच *५/ड प्रभागाच्यायांनी कल्याण (पश्चिम) कोळीवाडा येथील *"बॉम्बेवाला चाळ"* या तळ + १ मजली अतिधोकादायक चाळीवर निष्कासनाची धडक कारवाई 9 नवम्बर रोजी केली.

 ३/क प्रभागाची सदर चाळ सुमारे *१०० वर्षे जूनी* असून तीचा काही भाग दिवाळीच्या कालावधीत पडला होता परंतू रहिवासी इमारत रिकामी करण्यास तयार नव्हते. आता सदर चाळीतील रहिवाशी यांना भोगवटा प्रमाणपत्र देवून इमारत रहिवास मुक्त करुन पूर्णपणे जमिनदोस्त करण्यात आली.

 सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे पथकप्रमुख सुखदेव धापोडकर व इतर कर्मचारी, महापालिकेचे पोलीस कर्मचारी, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलिस अधिकारी/कर्मचारी यांचे मदतीने आणि १ जेसीबी, १ पोकलेनच्या सहाय्याने करण्यात आली.


तसेच *५/ड प्रभागाच्या* सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी कल्याण (पूर्व) चक्कीनाका येथील *"आकाश महल"* या तळ + १ मजली लोडबेअरिंग अतिधोकादायक इमारतीवर निष्कासनाची धडक कारवाई आज केली. सदर इमारत सुमारे *५५ वर्षे जूनी* असून तीचा काही भाग दिवाळीच्या कालावधीत तोडण्यात आला होता परंतू रहिवासी इमारत रिकामी करण्यास तयार नव्हते. त्यामुळे रहिवाश्यांनी मागितलेली मुदत संपल्यावर सदर इमारतीचा वापर बंद करण्यात आला आणि रहिवाश्यांना भोगवटा प्रमाणपत्र देवून इमारत पूर्णपणे जमिनदोस्त करण्यात आली.

सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिकेचे ५ पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने आणि १ जेसीबी, १ पोकलेनच्या सहाय्याने करण्यात आली.

टिप्पण्या