डोंबिवलीतील टेबल टेनिसपटूंच्या साठी टेबल टेनिस कोर्ट

 लवकरच टेबल टेनिस कोर्टचे उद्घाटन खा. डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते:दिपेश म्हात्रे

DT न्यूज़/स्वदेश मालवीय

एंकर - डोंबिवलीतील टेबल टेनिसपटूंच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सावलराम क्रीडा संकुल येथे टेबल टेनिस कोर्ट बांधण्यात आले आहे.  लवकरच टेबल टेनिस कोर्टचे उद्घाटन कल्याण लोकसभा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.  अशी माहिती बाळासाहेबांच्या शिवसेनेचे युवा नेते दीपेश म्हात्रे यांनी शुक्रवारी टेबल टेनिस कोर्टचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांना दिली.  

               दिपेश म्हात्रे, माजी  सभापती

टेबल टेनिस खेळात रस असलेल्या खेळाडूंना सरावासाठी डोंबिवलीहून ठाणे आणि मुंबईला जावे लागते.  2019 मध्ये, दीपेश म्हात्रे यांनी स्थायी समिती अध्यक्ष असताना, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना सरावासाठी डोंबिवलीत चांगले कोर्ट उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने टेबल टेनिस कोर्टसाठी निधी मंजूर केला होता. त्यामुळेच डोंबिवलीतील सावलराम क्रीडा संकुलात खेळाडूंच्या सोयीनुसार नवीन टेबल टेनिस कोर्ट बांधण्यात आले आहे.

  येथे सराव करून डोंबिवलीतून कुशल खेळाडू जन्माला येतील आणि राष्ट्रीय स्तरावर डोंबिवलीसह महाराष्ट्राचे नाव लौकिक करतील, असे दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.

  

टिप्पण्या