रेरा घोटाळ्यामुळे अधिकृत विकासकांच्या परवानग्यांना विलंब

 महारेरा फसवणूक प्रकरणी एमसीएचआय घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

DT न्यूज़/स्वदेश मालवीय

कल्याण : कल्याण डोंबिवली मनपाक्षेत्रातील महारेरा फसवणूक घोटाळा प्रकरणात एकूण ६७  कथित विकासकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी एसआयटी, ईडी  या शासकीय यंत्रणाकडून चौकशी सुरू आहे. 

                          MCHI  सदस्य

मात्र गुन्हा दाखल झालेल्या कथित विकासकांमध्ये एकही जण महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीचा सदस्य नसल्याचा दावा कल्याण डोंबिवली विभागाच्या महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीतर्फे करण्यात आला.

            एमसीएचआयचे अध्यक्ष भरत छेडा

  या प्रकरणला ज्याने बाहेर आणलं त्यांचा आम्ही इथे सत्कार करणार होते परंतु सध्या ते दिल्लीला असून येथे येऊ शकले नाही. पण यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन रेरा प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची माहिती त्यांनी एमसीएचआय तर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी एमसीएचआयचे कल्याण डोंबिवली युनिट अध्यक्ष भरत छेडा, सचिव अरविंद वरक, माजी अध्यक्ष रवी पाटील यांच्यासःत इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या