१५ दिवसात पुरावे सादर करा अन्यथा एक रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार

  मनसेचे ठाणे जिल्हा संघटक हर्षद पाटील यांचा विद्या चव्हाण यांना इशारा 

DT न्यूज/स्वदेश मालवीय

कल्याण  :   राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्यावर केलेलं आरोप हे सिद्ध करावेत अन्यथा १ रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा मनसेने दिला आहे. कल्याण ग्रामीण मधील एका प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी आमदार राजू पाटील यांचा कोणताही संबंध नसताना नाव घेतले आहे. यावर आता मनसे कडून देखील प्रतिक्रिया आली आहे


कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू पाटील यांचे नाव एका प्रकरणाशी गोवून बदनाम करण्याचे षडयंत्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरु आहे. संबंधित प्रकरणाशी कोणताही संबंध नसतानाही जाणीवपूर्वक आमदार राजू पाटील यांचा नाव घेण्यात आल्याने मनसेने एक रुपयांचा दावा न्यायालयात दाखल करण्याचा इशारा दिला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्याकडे असलेले पुरावे त्यांनी सादर करावेत अन्यथा न्यायालयीन लढ्याला सामोरे जावे असा इशारा मनसेचे ठाणे जिल्हा संघटक हर्षद पाटील यांच्याकडून देण्यात आला आहे.

टिप्पण्या