मानपाडा पोलीसांनी २४ तासात ४० तोळे चोरीचे सोन्याच्या दागिन्यांचा लावला छडा

मावस बहिणीने मारला बहिणीच्या दागिन्यांवर डल्ला;सीसीटीव्ही आधारे अटक

DT न्यूज/स्वदेश मालवीय

डोंबिवली: मानपाडा पोलीस ठाणेचे हद्दीत लोढा पलावा येथे प्रिया रवी सक्सेना, यांच्या तिजोरीची व घराची चावी मावस बहीण सिमरन पाटील हिने लांबवून घरातील तिजोरी तील तब्बल 400 ग्राम सोने चोरल्याची घटना सीसीटीव्ही द्वारे उघड झाली आहे.

महिला वर्गास त्यांचे सोन्याचे आभूषण हा संवेदनशिल विषय असून, नमुद गुन्हयाचे फिर्यादी महिला यांचे लग्नाचे दागिने चोरीस गेल्याने वपोनिरी. शेखर बागडे यांनी लागलीच गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या वेगवेगळ्या टीम तयार करून त्यांना गुन्हा उघडकीस आणणे कामी सुचना व मार्गदर्शन करून रवाना केले.

                   वपोनिरी. शेखर बागडे

त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासात फिर्यादी यांची मावस बहिण सिमरन पाटील हिंची संशयास्पद वागणुक पाहता, तिचेकडे केलेल्या तपासात तसेच सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासात फिर्यादीची कामोठे नवी मुंबई येथे राहणारी मावस बहिण सिमरन पाटील हिने,  रात्री रिक्षाने फिर्यादी यांचे घरी येवुन दागिने चोरल्याचे उघड झाले ,  मानपाडा पोलिसांच्या डिबी टीम चे सपोनि / अविनाश बनवे, सपोनि सुनिल तारमळे, सपोनि श्रीकृष्ण गोरे,आणि अंमलदार यांनी24 तासात या गुन्ह्याची उखळ करून मुद्देमाल हस्तगत केला आहे.

टिप्पण्या