मनपाची महारेरा घोटाळा इमारतीवर तोडक कार्रवाई

 आडीवली ढोकली मधिल बोगस बांधकाम परवाना ,महारेरा घोटाळा इमारतीवर तोडक कार्रवाई

DT न्यूज़ /स्वदेश मालवीय

 कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत, 9/आय प्रभाग, अडवली ढोकली मधील इमारतीवर अखेर महानगरपालिकेचा जेसीबी फिरला , बोगस परवाना बनवून महारेरा घोटाळा करणाऱ्या विकासकांवर पालिकेने शिकंजा कसला असून , आयुक्त व  अतिरिक्त आयुक्त  यांच्या निर्देशानुसार तसेच  उप आयुक्त जगताप  यांचे मार्गदर्शनाखाली  प्रभाग 9/आय च्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्या पथकाने  आडीवली ढोकली येथील बोगस  बांधकाम परवानगी प्रकरणांतील  तळ + 4 मजली रहिवास नसलेली इमारत निष्कासित करण्यात आली आहे . 

                  बोगस रेरा इमारती

JCB , POKLAN,ब्रेकर  हि यंत्रसामुग्री, ठेकेदाराचे वीस मजूर , आय प्रभागातील अनधिकृत बांधकाम नियंत्रण कामगार याच्या सहाय्याने ही कारवाई करण्यांत आली . कारवाई करतां ,सहा. आयुक्त, 9/आय प्रभाग हेमा मुंबरकर, 5/ड चे प्रभाग जगताप,  हनुमंत यादव प्रभारी अधीक्षक अनधिकृत बांधकाम नियंत्रण आय प्रभाग, महानगरपालिकेचे पोलीस अधिकारी/कर्मचारी तसेच मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलिस अंमलदार कारवाईच्या ठीकाणी उपस्थित होते .बनावट कागदपत्रा नुसार , महारेरा रजिस्ट्रेशन करून ही इमारत शिवसागर यादव  यांनी बांधलेली होती , 

गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच वेगवेगळ्या टीम तयार करून आपण महारेरा घोटाळा इमारतींवरती कारवाई करणार असल्याचे कल्याण डोंबिवली महानगरपालिका तत्कालीन आयुक्तांकडून  सांगण्यात आले होते,

या कारवाईमुळे आता महारेरा घोटाळा करणाऱ्या विकासकांचे धाबे दणाणले आहेत. आता महारेरा  घोटाळ्यातील 62 इमारतींवरती कारवाईची टांगती तलवार असल्याचे दिसून येतेय..

टिप्पण्या