आजदे येथे बोगस बांधकाम परवाना आणि डोंबिवली पश्चिम येथील शासकीय भूखंडावर अनाधिकृत बांधकाम निष्कासीत
कल्याण डंबिवली महापालिकेच्या 9/आय व 7/ह प्रभागात अनधिकृत बांधकामावर निष्कसनाची धडक कारवाई !
DT न्यूज़/स्वदेश मालवीय
कल्याण: महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या निर्देशानुसार , 9/आय प्रभागाच्या सहा.आयुक्त हेमा मुंबरकर यांनी आजदे गोळवली येथील "बोगस" "बांधकाम परवानगी" प्रकरणातील अर्जुन गायकर व इतर, यांच्या ओम साई कन्स्ट्रक्शन तर्फे राजन सिताराम भोजने यांच्या "आर.सी.सी तळ + 5" मजल्याच्या बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई काल दिवसभरात केली यात दुकानांचे शटर देखील तोडण्यात आले...
कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलीस, मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी, 1 जेसीबी, 4 गॅस कटर, 4 ब्रेकर यांच्या साह्याने करण्यात आली.
तसेच 7/ह प्रभागात सहा.आयुक्त सुहास गुप्ते यांनी डोंबिवली पश्चिम येथील भारतमाता शाळेजवळ "शासकीय भूखंडावर" झालेल्या प्लीथ बांधकाम पूर्णपणे उखडून टाकण्याची कारवाई केली. सदर कारवाई शासकीय भूखंडावर असल्याने, तहसील कार्यालयाचे तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या उपस्थितीत, महापालिका पोलीस कर्मचारी, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, 1 गॅस कटर, 1 ब्रेकर, 1 जेसीबी यांच्या साहाय्याने करण्यात आली.




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा